… तरच कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील :डॉ. हेमंत देशपांडे

0

रावेत – प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेते पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. हेमंत देशपांडे यांनी केले. ते वाल्हेकरवाडी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला आणि त्यांचे आजार या विषयी बोलत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाल्हेकरवाडी यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना ‘सावित्रीबाई फुले समाज गौरव पुरस्कार 2018’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेविका भारती फरांदे, पल्लवी चिंचवडे, श्रीधर वाल्हेकर, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, बाळासाहेब वाल्हेकर, ग्रामीण कवी महेश कोरडे, शेखर चिंचवडे, प्रदीप वाल्हेकर, नितीन शिंदे, संदीप चिंचवडे, धनाजी येळकर पाटील, राजेंद्र देवकर, नारायण चिघळीकर, श्रीकांत धनगर, हनुमंत माळी, अनिल साळुंके, प्रदीप दर्शीले, अमर ताजणे, वैजीनाथ माळी, हेमंत ननावरे, दिलीप भोसले आदी उपस्थित होते.

तेव्हाच महिलांचा सन्मान होईल
बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले की, एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या बाबत बोलतो त्याचवेळी समाजात स्त्रियांंवर होणारे अत्याचार वाढत आहेत. हे प्रमाण ज्यावेळी कमी होईल किंबहुना ते नष्ट होईल तेव्हाच ख-या अर्थाने महिलांचा सन्मान होईल. माजी महापौर अपर्णा डोके म्हणाल्या की, स्त्री म्हणजे घरचा आधार. बहीण, पत्नी, आई, आजी अशा अनेक भूमिकांमधून ती जाते. ही सगळे कर्तव्य पार पडत असताना स्वत:कडे लक्ष दिले जात नाही. पुरुषांच्या मानाने स्त्रियांच्या आयुष्यात घडणार्‍या वेगवेगळ्या बदलांमुळे आरोग्याची काळजी जास्त घ्यावी लागते. 30 ते 35 वयोगटतील स्त्रियांना आपल्या आरोग्याबद्दल अधिक सजग राहण्याची गरज आहे. यावेळी महिलांना संस्थेच्यावतीने सॅनीटरी नॅपकीन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर भंडारे यांनी प्रास्ताविक उमा क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन अनुराधा सानप यांनी केले. करुणा चिंचवडे, रेखा दर्शिले, पल्लवी वाल्हेकर या सावित्रीबाई फुले समाज गौरव पुरस्कार 2018 चे मानकरी ठरल्या आहेत. यावेळी ग्रामीण कवी महेश कोरडे यांच्या कवितेच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले.