होळनांथे। शिरपुर तालुक्यातील तरडी भावेर रस्त्यावर पावसाच्या पाण्याने मोठी दरी निर्माण झाली असून तरडी भावेर या मुख्य रस्त्यावर एका नाल्यालगत पावसाळ्यात जवळपास वीस ते पंचवीस फुट लांब व आठ ते दहा फुट खोल रस्ता कोरला गेला असून ही दरी धोकादायक ठरत आहे.
पावसाच्या पाण्याने कोरला रस्ता
तरडी भावेर रस्त्यावरील एका नाल्यालगत जून महिन्यात झालेल्या पावसाच्या पाण्याने रस्त्यापूर्णत: कोरला गेला असून एका वळणावर तर वीस ते पंचवीस फुट लांब व आठ ते दहा फुट खोल दरी निर्माण झाली असून ही दरी प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाच्या पाण्याने निर्माण झालेली ही धोकादायक दरी जवळपास दहा महिन्यापासून जैसे थे अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभाग नेमके करते काय? हा प्रश्न परिसरातून व्यक्त होत आहे.
तरडी-भावरे या तीन किलोमिटर असलेल्या वळणदार रस्त्याच्या दुतर्फी काटेरी झुडपे वाढले असून सदर काटेरी झुडप्यामुळे वाहन चालकांना मोठ्या कसरतीने वाहन चालवावे लागते तरी सदर रस्त्यावरील काटेरी झुडपे तोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.