शिरपूर- तालुक्यातील तरडी गाव शिवारातील वैकुंठ धामाच्या पुढे असलेल्या बारीक धरणाशेजारी पावरा यांच्या शेतात जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकत 14 जुगार्यांच्या मुसक्या आवळत एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला. झन्नामन्ना जुगार खेळणार्या दादाजी नाना पवार (भील), हुकूमचंद महादू जोशी, राजू देविदास भील, रोहिदास दिनकर भील, दिनेश उत्तम भील, प्रकाश भील, दिनेश भील, बापू नाना भील, गोरख बारकू भील, रोहिदास रामदास भील (रा. तरडी, ता.शिरपूर), गटलू टिसाळे, प्रकाश पाटील यांना ताब्यात घेतले. या वेळी भाऊ कोळी, बंजारा जाधव यांच्यासह अन्य 4 ते 5 जण पसार झाले. पोलिसांनी सहा मोटारसायकली, दोन मोबाइल, पत्त्याची कॅट असा एक लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत टाकणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.