तरवाडे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका उलटली ; चालक जखमी

0

चाळीसगाव : तालुक्यातील तरवाडे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रुग्णाला घरी सोडून परतत असताना खडकी-तांबोळे रस्त्यावर उलटली तर या अपघातात वाहन चालक जखमी झाला. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या रुग्णांना तांबोळे येथे सोडण्यासाठी रुग्णवाहिका (एम.एच.19 एम.9273) वर चालक एम.जे.गायकवाड हे गेले होते.

रुग्णांना घरी सोडल्यानंतर ते परतत असताना खड्डेमय अरुंद रस्त्यामुळे वाहन उलटले व गायकवाड यांच्या डोक्यासह नाकाला ईजा झाली. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला उपचारार्थ हलवण्याकामी सहकार्य केले. या अपघात प्रकरणी तरवाडे आरोगय केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विरेंद्र पाटील अधिक माहिती घेत आहेत.