तरवाडे बुद्रुक गावाला विशेष उत्कृष्ट मिरवणूक पारितोषिक

0

चाळीसगाव । जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून गणपती उत्सव मंडळासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन चाळीसगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तरवाडे बुद्रुक येथील गणेश मंडळाचा विशेष पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून गणपती उत्सव मंडळासाठी जिल्ह्यात विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील इतर गणेश मंडळेही सन्मानित
या स्पर्धेत तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावाला विशेष उत्कृष्ट शांतता प्रिय मिरवणूक पारितोषिक जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील गणेश मंडळानाही सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमास आमदार उन्मेश पाटील, डी.वाय.एस.पी अरविंद पाटील, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस पाटील जिवन पाटील., अध्यक्ष रवींद्र पवार, ज्ञानेश्‍वर महाडीक, अमोल पवार, सागर शिंदे, बाल गणेश मित्र कार्यकर्ते उपस्थित होते.