चाळीसगाव । लग्न समारंभात महीलांच्या अंगावर फुले व अक्षदा फेकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून 8 जणांनी तिघांना शिवीगाळ, मारहान करून एकाने नाकावर बुक्का मारून नाकाचे हाड मोडल्याची घटना दि. 7 मे 2017 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील तरवाडे येथे घडली असून जखमी फिर्यादीने आज 11 मे 2017 रोजी वैद्यकीय दाखला देऊन जबाब दिल्यावरून तरवाडे येथील 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडून फिर्यादीकडील मंडळींना शिवीगाळ करून बुक्का मारून नाकावर मोडले हाड
तालुक्यातील तरवाडे येथे मयुर चंद्रकांत कदम (19) धंदा शिक्षण रा. पंचशील नगर चाळीसगाव यांच्या चुलत बहीणीचे लग्न आरोपी अर्जुन शंकर गरूड (रा तरवाडे ता. चाळीसगाव) यांच्या मुलाशी 7 मे 2017 रोजी होते म्हणून फिर्यादी मयुर कदम हे परिवारासह लग्नाला गेले होते. दि. 7 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास तरवाडे गावी आरोपीच्या घरासमोर लग्न लागत असतांना गावातील आरोपी सचीन बागुल, किरण बागुल अण्णा उर्फ ईश्वर अहीरे, रामा गरूड, प्रशांत गरूड, ऋषी लीहणर, अर्जुन शंकर गरूड यांचा मुलगा व दिनकर शंकर गरूड यांचा मुलगा सर्व रा. तरवाडे ता. चाळीसगाव यांनी त्यांच्या हातातील फुल व अक्षदा फिर्यादीच्या महीला व मुलीच्या अंगावर फेकल्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ पंकज कदम याने आरोपींना जाब विचारला याचा राग येऊन वरील आरोपी सचिन बागुल, किरण बागुल, अण्णा उर्फ ईश्वर अहीरे, रामा गरूड, प्रशांत गरूड, ऋषी लिहणर, अर्जुन शंकर गरूड, याचा मुलगा दिनकर शंकर गरूड याचा मुलगा यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली त्यात आरोपी सचिन बागुल याने मयुर कदम यांंना शिवीगाळ मारहाण करून त्याच्या नाकावर बुक्का मारून नाकाचे हाड मोडले तर सर्वांनी पंकज कदम यांना शिवीगाळ मारहान केली. भांडण सोडविण्यासाठी सौ. रेखा चंद्रकांत कदम या गेल्या असता त्यांच्या झटापटीत त्यांच्या गळ्यामधील 8 ग्रॅम सोन्याची पोत तुटून गहाळ झाली तर मयुर कदम यांच्या खिश्यातील 2700 रूपये पडून नुकसान झाले व याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक भुपेश वंजारी करीत आहेत.