‘तरवाडे-सिताणे’वर जवाहरचे वर्चस्व

0

धुळे (प्रतिनिधी) – तालुक्यातील तरवाडे-सिताणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत जवाहर गटाच्या पॅनलने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवित भाजपाच्या पॅनलचा पार धुव्वा उडविला आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरवाडे-सिताणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकित एकूण 13 जागांकरीता जवाहर विकास पॅनल उभे करण्यात आले होते.त्यांच्या विरोधात भाजपाच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे होते. याकरीता दि.4 डिसेंबर रोजी तरवाडे येथे मतदान घेण्यात आले.

विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
मतदानानंतर लगेच झालेल्या मतमोजणीत पॅनलप्रमुख लहू पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर विकास पॅनलने भाजपच्या सर्व उमेदवारांना धोबीपछाड मारीत संपूर्ण पॅनलचा धुव्वा उडविला.त्यात जवाहर विकास पॅनलचे माळी चिंतामण राजाराम, पाटील रमेश रतन, पाटील शरद उत्तम, माळी मधुकर दौलत, माळी सदाशिव महादू, जाधव धारेसिंग उत्तमसिंग, पाटील मधुकर लुका, निकम अशोक नरसिंग, पाटील विजय रामभाऊ, वंजारी नथ्थू झिपा, पाटील संगिता सुरेश, राजपुत प्रेमकोरबाई पदमसिंग, पवार यशोद सोनू हे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले.निवडणूकिच्या यशस्वीतेकरीता पॅनलप्रमुख खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, विनायक पाटील आदींनी परिश्रम घेतले.