जळगाव । तरसोदफाटा ते गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी 24 जुलैला रास्तारोको आंदोलन करण्यत येणार आहे. संकष्टी चतुर्थीसह इतर दिवशीही जिल्हाभरातून भाविक दर्शनाला येत असतात. परंतु, महामार्गापासून तरसोद गावापर्यंत जाणार्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने नागरिकांना वाहन चालवणे जिकरीचे होत आहे. जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे तरसोद रिक्षा युनियन, गणपती मंदिर संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने 24 जुलैला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.