जळगाव । तालुक्यातील तरसोद हे गाव गणपतीसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी दर्शनासाठी राज्यातुन नागरिक येत असतात,मात्र या मंदिराला जाणार्या रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच ग्रामस्थांना या रस्त्यामुळे अनेक दुखापतीचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी सोमवार 24 रोजी सकाळी 10 वाजता तरसोद फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अभियंता बेडगे यांनी निवेदन स्विकारून येत्या दोन महिन्यात हा रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
ग्रामस्थांना रोज याच रस्त्याने जळगाव व नशिराबाद याठिकाणी ये-जा करावी लागते. त्यामुळे वाहन चालवितांना त्यांना खड्डयांचा त्रास सहन करावा लागतो. या ओबड धोबड रस्त्यामुळे शाळेत जाणार्या विद्यार्थींना त्रास सहन करावा लागतो. यावेळी पंकज बोरोले, दिपक राजपुत, अशोक सुरवाडे, मुरलीधर काळे, दिलीप पाटील, रविद्र पाटील,राजु सावकारे, मोतीलाल पाटील, भुषण राजपुत, गणेश शिंदे, प्रकाश राजपुत, जनाबाई पाटील, सुरेखा सुनिल पाटील, रोहिणी अंनत थोरात, सुनिता पाटील,नलीनी थोरात, रेमशा पाटील, प्रतिभा राजपूत, सुमनबाई पाटील, इंदू थोरात यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात महिला व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सपोनि आर.टी.धारबळे व त्याचे सहकार्यांनी बंदोबस्त ठेवला.