जळगाव । तालुक्यातील तरसोद येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत शनिवार 11 मार्च रोजी आसोदा गट अंतर्गत शिक्षण परिषदेचे पुष्प-6 वे उत्साहात पार पडले. या परिषदेला आसोदा, ममुराबाद, तरसोद, आव्हॉणे बॉईज, आव्हाणे कन्या, थेपडे ग्लोबल, हाव्हाणे हायस्कुल, शरद पवार प्रा.शाळा, या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी आणि शिक्षकांमध्ये विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने ‘शिक्षण परिषद’ (गटसंमेलन) ची संकल्पना सुरू केली असून तरसोद येथील जि.प. मुलांच्या शाळेत या परिषदेचे पुष्प-6 वे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पुजनाने झाली. अध्यक्षस्थानी मनोहर खोंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तरसोद शिक्षण समिती अध्यक्ष सुधाकर सोनवणे, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दै.देशदूतचे उपसंपादक राजेंद्र पाटील, केंद्रप्रमुख भगवान वाघे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांतर्फे एकांकिका
‘बेटी बोझ नही-विद्यार्थिनी प्रज्ञा सुरवाडे, अशी झाली पंगत- स्वाती ठाकरे यांनी एकांकीका सारद केल्या. त्याचप्रमाणे राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असते. देशाचा नागरिक कौशल्यपूर्ण व सक्षम होण्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची भूमिका पायाभूत मानली जाते. तरसोद शाळेत आयोजीत आसोदा गटाच्या शिक्षण परिषदेत विविध शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या नवनविन उपक्रमांची माहिती, पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी, विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा यावेळी शिक्षक वृंदांनी केली. आभार शिक्षक्षका वैशाली चौधरी यांनी मानले.
पत्रकार राजेंद्र पाटील यांचा सत्कार : तरसोद जि.प.मराठी शाळेच्या वतीने तरसोदचे महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र पाटील यांनातंटामुक्ती विभागाचा जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्यावतीने केंद्रप्रमुख भगवान वाघे, मुख्याध्यापक उखर्डू चव्हाण, शिक्षक सुदाम बडगुजर यांनी सत्कार केला.
‘स्वरांगीनी’ हस्तपुस्तीकेचे प्रकाशन: मिना राजू मंच अंतर्गत येथील मराठी शाळेच्या इ. 7 विच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘स्वरांगीनी’ हस्तपुस्तीकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात विद्यार्थिनींनी वर्षभरात शाळेत राबविलेल्या नवनविन उपक्रमांचे सचित्र माहिती, वृत्तपत्रांमध्ये ओल्या बातम्यांची माहिती दिली आहे.
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन
संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षण क्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन आहे. शाळेतील शिक्षक सुदाम बडगुजर, सुनिता भारंबे, योगिता पवार, वैशाली चौधरी, कल्पना तरवटे यांनी शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे, वर्गातील अभ्यास वर्ग, खेळ, तसेच विविध कार्यक्रमांचे संगणकाचा वापर करून कल्पकतेने तयार केला.