तरुणांनी उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रीत करून रोजगार निर्माण करा

0

चाळीसगाव । तरुणांनी नोकरी मिळेल या आशेवर विसंबून न राहता उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रीत करुन रोजगार निर्माण करावे असे प्रतिपादन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी तालुक्यातील भोरस खु येथे 10 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 वाजता रयत सेना शाखा फलकाचे उद्घाटन प्रसंगी केले. तालुक्यातील भोरस खुर्द येथे रविवार 10 सप्टेंबर 2017 रोजी रयत सेना शाखा फलकाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण वक्ते रवि चव्हाण, भोरस येथील श्रावण पाटील, भाऊसाहेब पवार, रोहिदास शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांचे प्रतिपादन
गणेश पवार म्हणाले की, रयत सेना विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नविन वाटा या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा, गरजु गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थीं व विद्यार्थींचा गुणगौरव, आरोग्य शिबाराचे आयोजन, वंचित घटकातील महिलांना आर्युविमा वाटप व आर्थिक मदत दिली असुन शेतकर्‍यांच्या धान्य मालाला भाव मिळण्यासाठी आंदोलन. शेतकर्‍यांच्या मकेच्या तोलाईमध्ये मापात पाप करणार्‍या बाजार समिती प्रशासना विरोधात आक्रमक भूमिका घेऊन शेतकर्‍यांना न्याय मिळवुन देण्यात संघटनेचे मोठे योगदान, राज्यभर शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभाग, महापुरुषांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन, चाळीसगांव येथील सिग्नल पॉईंट येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मराक व्हावे याकरिता आंदोलन, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेस चा रेल्वे प्रशासनाने थांबा रद्द केला तो थांबा पुन्हा सुरु होण्यासाठी आंदोलन.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजन जयदीप पवार यांनी केले होते. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोल्हे, राजेश पाटील, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहरध्यक्ष दत्तु पवार, तालुकाउपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, योगेश पाटील, अनिल पाटील, शिक्षक सेना कार्याध्यक्ष गोकुळ पाटील, विभाग प्रमुख सागर सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख गणेश देशमुख, समन्वयक अभिमन्यू महाजन, प्रभाकर पाटील, सागर चव्हाण, चालक मालक सेनेचे अध्यक्ष रवींद्र पवार तर भोरस येथील वैभव पवार, संदीप जाधव, योगेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप पवार यांनी तर आभार सागर पाटील यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकारिणी घोषित
यावेळी शाखाध्यक्षपदी सागर पाटील, उपाध्यक्ष एकनाथ पाटील. सचिव प्रंशात पवार, सहसचिव तुषार पवार, संघटक कमलेश जगताप, समन्वयक पवन पाटील, कोषाध्यक्ष गोपाल देवकर, प्रसिद्धी प्रमुख जयदीप पवार, सदस्य सचिन जाधव, गणेश पाटील, पवन पवार, वैभव पाटील, निलेश जगताप, रोशन पाटील, प्रशांत पाटील, विजय जगताप, गणेश पाटील, भोलेनाथ पवार, अजय जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.