तरुणांनी छत्रपती संभाजी राजांचा आदर्श घेण्याची आवश्यकता

0

बोदवड। तालुक्यातील मनुर बु. येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होेता त्यात प्रमुख व्याख्याते संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अमोल मिटकरी यावेळी ते बोेलत होते. छत्रपती संभाजी आजच्या तरुणांचे आदर्श असले पाहिजे. यावेळी प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष संंजय काकडे, जनाबाई महाराज, सरपंच अर्चना खेलवाडे, समाधान सुशीर, पत्रकार अमोल न्हावी, संदिप वैष्णव, विनोद पाडर.

जन्मदात्या आई, वडिलांना सन्मानाने वागवा
पुढे बोलतांना छत्रपती संभाजी महाराज 140 लढाया लढले त्यापैकी एकदाही पराभूत झाले नाही. संभाजी महाराजांना एकाच वेळेस पाच-पाच शत्रुंशी लढावे लागले. छत्रपती संभाजी महाराज हे बहुभाषिक होते. संस्कृत पंडीत होेते. त्यांनी शेतकर्‍यांना कर्ज माफ केले. स्वराज्यात सिंचनाची व्यवस्था केली. स्वराज्यात सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. त्यांनी वयाच्या 14 वर्षी बुध्दभुषणम लिहिला. वयाच्या 9व्या वर्षापासून प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव घेतला. तरुणांनी हाच आदर्श घेवून सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवावे. आई, वडिलांना सन्मानाने वागवावे. कोणत्याच प्रकारचे अनैतिक कर्म करु नये, व्यसन करु नये, सर्व प्रकारच्या भाषा अवगत कराव्या, परस्त्री सन्मान करावा, सध्याचे सरकार शेतकर्‍यांना फायद्याचे नाही. कर्जमाफीच्या मुद्यावरुन बनवाबनवी करत आहे. सध्याचे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत आहे. परिणामी शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहे. अशा प्रकारचे दुष्परिणाम रोखायचे असतील तर संभाजी ब्रिगेडला सत्ता द्या, असे प्रतिपादन अमोल मिटकरील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगिराज ढोले, शुभम सोनवणे, तुषार उगले, सागर कुकडे, शैैलेश सोनोनी, विशाल इंगळे, सुनिल ढोले, सुरज सोनवणे, शुभम शेळके, गणेश इंगळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिला, तालुक्यातील संभाजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.