तरुणांनी नोकरी आणि उद्योगधंद्याकडे वळावे

0

चाळीसगाव । काळ दिवसेंदिवस बदलत असून नौकरी आणि रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी तरुणांनी आपल्या दिशा ठरवून घेतल्या पाहिजेत. कौशल्य असणार्‍या कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यामुळे तरुणांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात कुशल असल पाहिजे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतात कौशल्य विकासावर कधी नव्हे इतका भर दिला जात आहे. त्यातूनच कुशल तरुणांची संख्या वाढून मेक इन इंडियाचे स्वप्न साकारता येईल मात्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला गल्लेलठ्ठ पगाराची नौकरी मिळेलच या अपेक्षेवर न राहता तरुणांनी उद्योग, स्वयंरोजगार याकडे वळावे असे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेशदादा पाटील यांनी केले. आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव नगरपरिषदेतर्फे आयोजित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना व नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून आयोजित भव्य नौकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशालता चव्हाण होत्या. सूत्रसंचालन अमोल नानकर यांनी तर आभार सोनाली मोगलाइकर यांनी मानले.

तालुक्यात प्रथमच नोकरी मेळावा
नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुलांनी परिश्रम घेऊन आहे त्या साधनांमध्ये प्रगती साधली पाहिजे. आपल्याला हवी असणारी नौकरी शोधण्यासाठी मुंबई-पुणे-नाशिक येथे पैसे खर्च करून पायपीट करावी लागते मात्र मार्गदर्शन नसल्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा देखील येते मात्र नगरपरिषदेच्या माध्यमातून तालुक्यात प्रथमच नौकरी मेळाव्याला नामांकित अश्या कंपन्या एकाच छताखाली आल्यामुळे तरुणांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे असे सांगून त्यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी-नगरसेवकांचे अभिनंदन केले. यशस्वीतेसाठी चाळीसगाव नगरपरिषद कर्मचारी, शांतिदेवी चव्हाण, पॉलीटेक्निक कॉलेजच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

मेळाव्यात यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, आशाबाई चव्हाण, राजेंद्र चौधरी, श्रीकृष्ण भालसिंग, प.स.सभापती स्मितल बोरसे, संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंगलाताई जाधव, संपदाताई पाटील, शेखर बजाज, घृष्णेश्वर पाटील, विजया भिकन पवार, विजया प्रकाश पवार, रंजनाताई सोनवणे, सायली रोशन जाधव, संजयआबा राजपूत, नानाभाऊ कुमावत, सोमसिंग राजपूत, नितीन पाटील, आनंद खरात, अरुण अहिरे, बाळासाहेब मोरे, चंद्रकांत तायडे, चिरागोद्दीन शेख, भास्कर पाटील, मानसिंग राजपूत, गणेश महाले, विश्वास चव्हाण, पियुष साळुंखे, लालचंद बजाज, प्रा.ए.ओ.पाटील, बाळासाहेब राऊत, विश्वजीत पाटील, माजी प्रभाकर चौधरी, अ‍ॅड.धनंजय ठोके, जेसी संजय पवार, राकेश बोरसे, सुशील वानखेडे, प्रदीप राजपूत उपस्थित होते.

एक हजाराहून अधिकांना रोजगार
नोकरी मेळाव्याला देशभरातून 18 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते.दिवसेंदिवस अधिकाधिक रोजगाराची संधी उपलब्ध असतांना अनेकांना योग्य वेळी व योग्य निर्णय न घेतल्यामुळे रोजगारापासून मुकावे लागते. या मेळाव्यात तालुक्यातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. 3 हजार पाचशे तरुणांनी अर्ज दाखल केले. तर एक हजाराहुन अधिक तरुणांना विविध कंपन्यात निवड करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या प्रांगणात विविध स्टोल्सच्या माध्यमातून उमेदवारांची नोंदणी, बायोडाटा संकलन करण्यात आली.