तरुणांनी पोलिसांचे मित्र बनून काम करण्याची गरज

0

बोदवड । कायदा-सुव्यवस्था राखण्याची जेवढी जबाबदारी पोलिसांवर आहे, तेवढीच जबाबदारी समाज आणि युवा वर्गावरही आहे. तरुणांनी पोलिसांचे मित्र बनून काम केल्यास अपप्रवृत्तीचा बंदोबस्त करायला वेळ लागणार नाही, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी बोदवडमध्ये केले.

अपर पोलिस अधीक्षक सिंग शनिवारी बोदवड पोलिस ठाणे गाठले. येथे कर्मचार्‍यांशी संवाध साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येकाने इमानदारीने काम करावे. कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे कर्तव्याला जागा असे सांगितले. यानंतर त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांसाठी सुरू असलेल्या निवासस्थान बांधकामस्थळी भेट दिली. पोलिस पोलिस वसाहत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. दरम्यान, सिंग यांनी बोदवड शहरातील काही प्रतिष्ठीतांशी संवाद साधला. शहर, तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी सुभाष नेवे यांनी सर्व भांडणांचे मूळ दारुमध्ये असते. त्यामुळे दारुचे समूळ निर्मुलन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. गेल्या महिन्यापासून बेपत्ता झालेला तरुण रवींद्र ठाकरे याच्याविषयी माहिती घेत तपासाला पुन्हा वेग देवू असे सांगितले. पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढाव, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सुकाळे, नरगसेवक कैलास माळी आदी उपस्थित होते.