शिरपूर:देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना सध्या अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने देशातील तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येऊन सामाजिक कार्य करावे, असे प्रतिपादन बोराडी येथील फुलामाय कन्या वसतीगृहात रक्तदान शिबिराचे आयोजनाच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी केले.
बोराडी येथील सामाजिक कार्यकर्ते कै.विजय देवरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिरपूर तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी स्वत:रक्तदान करत शिबिराचे उद्घाटन केले.अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे होते.
यावेळी डाॅ.भास्कर पाटील,ज्ञानेश्वर पाटील, संस्थेचे सदस्य शामकांत पाटील,दिलीप देवरे, राजेंद्र जाधव,किशोर भदाणे, रविंद्र शिंदे,विठ्ठल जगताप, अशोक तिरमले, प्रमोद पाटील, भागवत पवार, तुषार सत्यविजय, बबन पाटील, नितीन पाटील, गणेश भामरे, भरत पावरा उपस्थित होते. धुळे येथील निर्णय जनसेवा रक्तपेढीने रक्त संकलनाचे काम केले.शिबिराचे आयोजन राहुल रंधे, कांतीलाल देवरे यांच्यावतीने केले होते.
संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे़. कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी भाजपचे माजी अध्यक्ष राहुल रंधे यांनी स्वत: रक्तदान करत शिबिरात सहभाग नोंदविला़. रक्तदान करण्यासाठी शिबिराच्या ठिकाणी सोशल डिस्टनसीगच्या नियमांचे पालन करून शिबिरात वारंवार सॅनीटायझर वापर करुन निर्जंतूनीकिरण केले जात होते़. रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला़.
यशस्वीतेसाठी अंबादास सगरे, लक्ष्मण गोपाळ,गजानन बडगुजर, निशांत पाटील, विजय(बाळा) पाटील, विजय गोपाळ, पिंटु ठाकुर, पंकज पाटील,राजु सत्यविजय, बापु बडगुजर, तुषार गोपाळ,योगेश गोपाळ यांनी परिश्रम घेतले.