नवी दिल्ली : ढिन्चॅक पूजा … आया कुछ ध्यानमें? ही आहे सोशल मीडियात धम्माल उडवून देणारी नव्या युगाची नवी प्रतिनिधी, तरुणाईच्या गळ्यातील ताईत! आजच्या युवा पिढीचा आयकॉन बनलीय ही गायक पोर… तिचा हसण्या-खिदळण्याचा नवा फंडा लोकांना जाम भावलाय… अखेर ही गायक पोर लोकांना का बर सतावतेय… गाणं ऐकवून कुणाचा बदला घ्यायचा आहे या पोरीला… गाण ऐकून असं बेहाल व्हायला झालंय लोकांना… ढिन्चॅक पूजा या नावाने पॉप्युलर झालेली ही मुलगी आपली गाणी ’यूट्यूब’वर अपलोड करते. तिचे हे व्हीडिओ धकाधकीच्या युगात तरुण पिढीला हसण्याचं एक निमित्त बनलंय. ’स्वॅगवाली टोपी’ गाण्यानंतर पूजाचे ’दारू-दारू’ किंवा ’सेल्फि मैने ले ली आज’ अशी गाणी एका पाठोपाठ एक आली. गाण्यांवर लाखो लोकांच्या लाईक्स आल्या. सध्या दोस्तांच्या पार्ट्या आणि गॉसिप पूजाच्या नावाने बहरत आहेत.
सोशल मिडिया असं विचित्र विचारपीठ आहे… काहीही बोलण्याची मुभा असते इथे. प्रसिद्ध व्हायचं तर सोशल मिडियासारखं माध्यम नाही. मनोरंजन विश्वात असे कित्येक चेहेरे असे आहेत की ज्यांनी सुरूवात सोशल मिडियातून केली होती. आज ते सुप्रसिद्ध आहेत.
सोशल मिडियाने केले पॉप्युलर
कित्येकजण यू ट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करतात. तो व्हायरल झाला तर विचारू नका. रातोरात लाखोजण त्यांना ओळखू लागतात. बीबी की वाईन्स ने भुवन बाम, गायिका जोनिता गांधी, श्रद्धा शर्मा ही नावे पुढे आणली. तसंच आज एकच नाव सोशल मिडियावर ऐकायला मिळतंय. ते आहे ढिन्चॅक पूजा. पूजा आणि तिची गाणी कप्प्या कप्प्यात जाऊन पोहोचलीत जोकच्या स्वरूपात. सर्वजण त्याना ट्रॉल करताहेत.
ऑडीतून उतरून पूजा स्कूटरवर
आता पूजाचं आणखी एक गाणं आलंय. ’दिलों का शूटर मेरा स्कूटर’ असे त्याचे दिलखेचक बोल आहेत. मागच्या गाण्यात ऑडीत दिसलेली पूजा आता स्कूटरवर. पण ही स्कूटर सर्वात महागडी स्कूटर व्हेस्पा आहे. दोस्तांच्या गराड्यात असलेली पूजा स्कूटरवर मात्र एकटीच आहे. तिचे दोस्त तिच्या जोकचा विषय बनण्यापासून वाचण्यासाठी पळून तर गेले नाहीत ना…
खास लोकाग्रहास्तव बरं का…
पूजाची आतापर्यंतची सर्व गाणी जोकच बनली. त्यावर मेसेज आणि जोक व्हायरल होऊ लागले आहेत. कुणी तुम्हाला त्रास देतंय का…ढिन्चॅक पूजा ऐकवा त्याला. डोक पिकवा त्याचं. पूजाची गाणी ऐकवण म्हणजे मानसिक छळवणूक. पण पूजाला ही हेटाळणी मुळीच निराश करीत नाही. प्रत्येक नव्या गाण्याला तिची टीप असते…हे गाण लोकांचा आग्रह आहे म्हणून प्रसारीत करीत आहे….