लहानांपासुन ते युवकांपर्यत तेथुन आता वयोवृध्द सर्वच स्माँटफोनचा आहारी गेलेले आहे. हातमजुरी करणार्या कामगारापासुन मध्यमवर्गीय प्रत्येकाकडे डिजिटल युगात स्माँट फोन दिसु लागला आहे.भिकारी ही तो वापरु लागला आहे, इतर सर्वच बाबतीत फार काटकसर करणारे नागरीक मात्र नेटपँक व बँलेऩ्स टाकण्यासाठी पाचशे हजार रुपये मोजतांना दिसतात.सर्वच स्माँट झालेले दिसुन येत आहे .या स्माँट फोन मुळे सर्वच सोशल मिडीयाचा भुलभुल्लयात गुरफटले गेले आहेत.जो तो स्माँट फोनवर बोट सरकवत सोशल मिडीयाला चिटकलेला दिसुन येतो.लहान मुल ही खेळ सोडुन, मोठे गप्पा न करता डोकखाली करुन स्माँट फोन मध्ये रमलेले दिसुन येतात.तासनतास त्यात व्यस्त दिसतात.तरुणाई तर सोशल मिडीयाचा पुर्ण आहारी गेली आहे चँटींग व विविध अँपने त्यांना वेड करुन सोडल आहे.त्याचा परिणाम त्यांचा मानसिक,सामाजिक,शरिरीकतेवर होतांना दिसतोये. अनेक ठिकाणी स्माँट फोन वापरावर बंदी देखील केली आहे.कामावर परिणाम होत असल्याचे दिसुन येते आहे.लहान मुलांचे खेळण्याचे दिवस असतांना ते एका कोपर्यात स्माँट फोन एखाद्या एक्सपर्ट प्रमाणे चाळतांना पाहीले तर नवलच वाटते. संपर्काचे एक प्रभावी माध्यम असलेली सोशल मिडीया वेगळ्याच वळवणावर जात आहे ते घातक ठरु पाहत आहे त्याचा चांगला वापर केला तर तो प्रभावी आहे मात्र सोशल मिडीयामुळे सध्या तरुणांमध्ये सामाजिक बांधीलकी हरपत असल्याचे पहायला मिळत आहे.काही तरी आपत्तीजनक,धार्मिक भावना दुखवणारे पोष्ट टाकुन अफवांचे लोण पसरण्याचे प्रकार वाढीस लागले आहे.व्हाटसअँप ग्रुप ही फारच वाढले आहे. सर्वच क्षेत्र व्यापुन टाकत सोशल मिडीया उवाच होत आहे.व्हाटसग्रुपवर तर हे लांब लचक पोष्ट,रोज गुडमाँर्निग,कार्यक्रमाचे वीस पंचवीस फोटो टाकतात. ग्रुप अनेक लोक तेच तरी ही 20 ते 25 ग्रुप तेच परत मँसेज पोष्ट टाकले जातात.नेट सुरु केल तर पाऊस पडावा तसे मँसेच येतात, गँलेरीत हजारो फोटो येतात ते डिलीट करता नाके नऊ येते. वांरवार ग्रुप अँडमीन सुचना करतो त्याकडे लक्ष दिले जात नाही मग रिमु तर काही लेफ्ट होतात,मग त्यातुन कटुता वाढत जाते.
सोशल मिडीयावर असे दिसुन येते यातुन आपत्तीजनक पोष्ट व मँसेजने भांडणे होतात.दंगली ही होतात.तर काही बनावट आयडी तयार करुन अनेकांना ब्लेकमेल करण्याचे प्रकार घडतात यातुन खोटा गुन्हा दाखल होण्याचे प्रकार घडतात. या अशा प्रकारामुळे पोलीस प्रशासनास देखील मनस्ताप होतो.असे होते म्हणुन काहींनी सोशल मिडीयाचा वापर बंद करुन पुर्वीचा जुना साधा फोन वापरण्यास सुरुवात केली आहे काहींना या स्माँट फोनमुळे कानांचा आजार ही होत असुन बहिरेपणा बळकावत आहे. भ्रमणध्वनी हे संवादाचे प्रभावी साधन आहे पण त्यांचा अतिरेक पहायला मिळतोये.दुरध्वनीचे जागा आज स्माँट फोनने घेतली आहे.सर्वाना त्याच वेड लागल असुन बालपण,तरुणाई नष्ट झाली आहे.संवाद दुरावला आहे.पुर्वी दुरध्वनी संच होते त्यावेळी नातेवाईकांना आनंदाने नंबर दिला जायचा आणि सातासमुद्रा पार किंवा इतरत्र असलेल्या स्नेहजनांचा फोन साठी आतुरतेने कुटुंबीय वाट पहायचे, फार मजेचे दिवस होते ते.नंतर काँईन बाँक्स आले ,रुपया टाकत मस्त बोलता येत होत यातुन सुसंवाद होत प्रेम वाढीस लागुन समोरचा समाधानी व्हायचा.कालातंराने डिजीटल युग आले .तंत्रज्ञान बदलत जाऊन सोशल मिडीयाने ताबा मिळवुन सोशल मिडीया युग आले.त्यांनी अलिकडे सर्वाना एकटे केले आहे.संवाद बंद झाला आहे.त्यांचा आवाज सोशल मिडीयातुन निघतो आहे.आक्षेपाहँ मजकुर,चित्रफित,मँसेज यामुळे होनी च अनहोनी प्रकार समाजाला, कुटुंबियांना,पोलीसांना डोकेदुखी ठरत आहे.असे होत असतांना आपत्तीजनक व समाजात तेड निर्माण करणारे पोष्ट व अफवा बाबत जागृकता दाखविण्याची गरज आहे.कारण अफवांचा व आक्षेपार्ह पोष्टचा व्हायरल सर्वाना दुषीत करणारा आहे.आपत्ती जनक अफवा पसरवणार्या पोष्टचा उद्रेक टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.कारण अशा पोष्टचे पडसाद उमटत असतात.आपत्तीजनक पोष्टवर पाळत ठेवुन त्याबाबत जनजागृती आवश्यक आहे.सोशल मिडीयाचा सकारात्मक वापरासाठी तरुणांनी जागृत राहण्याची वेळ आली आहे नाही तर आपली पुढची पिढी भंयकर वळणावर गेलेली आपल्याला पाहायला मिळेल हे मात्र नक्की…!
-हेमंत पाटील, नवापूर
9823610627