एरंडोल : तालुक्यातील रींगणगाव येथील प्रमोद लक्ष्मण डोखे (31) या तरुणाने घराच्या छताच्या कडीला दोराचा गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी घडली. या प्रकरणी मयताचे भाऊ अमोल मुरलीधर डोखे यांनी एरंडोल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
प्रमोद डोखे यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असता वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील यांनी तपासणी करून मृत घोषित केले. प्रमोद यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.