तरुणाची रोमियोगीरी ; प्रेमासाठी स्वतःच्या हातावर ब्लेड मारुन, छातीवर लिहिले तरुणीचे नाव

0

धमकी देवून विनयभंग करणार्‍या तरुणाला अटक ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव- महाविद्यालयात शिकत असतांना 19 वर्षीय तरुणीची तरुणाची ओळखी झाली, यानंतर तीन वर्षाच्या काळात तरुणाने तरुणीचा प्रेमाचा स्विकार करावा यासाठी अनेक प्रताप केले. यानंतरही तरुणी ऐकत नसल्याने या महाभाग रोमियोने तरुणीचा माझ्या प्रेमाचा स्विकार केला नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबांला ठार मारेन अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धीरज दिलीप चिरमाडे रा. जुने जळगाव याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

महाविद्यालयात आली तरुणाच्या संपर्कात
शहरात तरुणी तिच्या आई वडील, तीन भाऊ दोन बहिणी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तरुणीच्या वडीलांचे शहरातच चहा पत्ती विक्रीचे दुकान आहे. 2016 मध्ये तरुणी बाहेती महाविद्यालयात शिकत असतांना इतर मित्रमैत्रिणींमुळे धीरज चिरमाडे याच्याशी ओळखी झाली. या ओळखीतून धिरजने तरुणीचा संपर्क क्रमांक घेतला. संपर्क करुन तुझ्यावर माझे प्रेम असून बाहेर फिरायला चल असे बोलू लागला. मात्र तरुणीच्या मनात धीरजबद्दल कुठलेही प्रेम नव्हते. यानंतरही धीरजने एकतर्फी प्रेमातून तरुणीची पिछा सोडला नाही. 2018 मध्ये तरुणी शिक्षण पूर्ण करुन घरीच होती. यादरम्यान धीरजने तरुणीच्या घरात कुणी नसतांना भेटण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणीचा भाऊ तसेच बहिणीला फोन करुन तिने माझ्या बोलावे म्हणून उध्दटपणे बोलत होता.

ब्लेड मारुन घेतले, छातीवर तरुणीचे नावही लिहिले
16 डिसेंबर रोजी धीरजने तरुणीच्या मोठ्या भावाला फोन करुन धमकी दिली, तसेच ब्लेडने स्वतःच्या हातावर वार करुन घेतले. डाव्या छातीवर तरुणीचे तर उजव्या छातीवर स्वतःचे नाव लिहून घेतले. त्याच्या छायाचित्र तरुणीला पाठविले. 19 रोजी तरुणी बाहेती महाविद्यालयात गेली असता, धीरजनेे तरुणीसोबतचे फोटो, रेकॉर्डींग व्हॉटस् फेसबुकवर वर टाकमून बदनामी करण्याची धमकी दिली. तुला कोणाशीही लग्न करुन देणार नाही. माझ्या प्रेमाचा स्विकार कर नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबांला मारुन टाकून अशी धमकी देत, अश्‍लिल हातवारे करुन तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी तरुणीने 27 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित धीरज स्वातंत्र्य चौकात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील, मुकेश पाटील यांनी ताब्यात घेतल. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहे.