Chitoda village youth murder case: fourth suspect in the net यावल : तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या खून प्रकरणी यावल पोलिसांनी चौथ्या पसार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. जितेंद्र कोळी उर्फ आतंक (अट्रावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी यावल शहरातील कचरा डेपोत लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
चार लाखांच्या वादातून खून
उसनवारीचे चार लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (38) या तरुणाचा अतिशय क्रूरतेने खून करण्यात आला. या खुनाच्या गुन्ह्यात कल्पना शशिकांत पाटील (चितोडा) हिने घरा शेजारील देवानंद बाळू कोळी यास 80 हजार रुपयात मनोज भंगाळे याला ठार करण्याची सुपारी दिलीण देवानंद कोळी (मूळ रा.यावल, हल्ली मु.चितोडा) याने मितेश उर्फ विघ्नेश भरतसिंग बारेला (रा.निमगाव) व जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) या दोघांना या कामासाठी सोबत घेतले होते व रविवारी रात्री मनोज भंगाळे यास कल्पना पाटील हिने शेतात बोलावून या चौघांनी गळा आवळून व तीक्ष्ण हत्याराने वार करुन भंगाळे याचा खून केला.
चौथा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
या गुन्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली तर चौथा संशयीत जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) हा पसार झाल्यानंतर त्यास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक फौजदार मुजफ्फर खान, सुशील घुगे, गणेश ढाकणे यांच्या पथकाने बुधवारी ताब्यात अटक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.