तरुणाच्या छळाने विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

0

जळगाव । येथील जैनाबाद परिसरातील रहिवाशी विवाहितेने तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब पतीच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अश्‍विनी हिम्मत कोळी(वय 21, रा.जैनाबाद) ही पती व दोन मुलांसह सध्या जळगावात राहते. अश्‍विनीचे माहेर कापूसवाडी, ता.जामनेर येथील असून त्याच गावातील एका 24 वर्षीय तरुणाच्या जाचाला कंटाळून आज सकाळी उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच पतीच्या तत्परतेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आता प्रकृती स्थिर आहे.