पिंपरी : फूटपाथवर बसलेल्या तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूचा तुकडा मारून जखमी केले. ही घटना रविवारी पावणेअकराच्या सुमारास संतोषी माता चौकातील गांधीनगरकडून येणार्या रोडच्या फूटपाथवर घडली. अनिकेत अनिल सर्जे (वय 22, रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत रविवारी रात्री पावणेअकराच्या सुरमारास नेहरूनगर मधील संतोषी माता चौकातील गांधीनगरकडून येणार्या रोडच्या फूटपाथवर बसले होते. अचानक मागच्या बाजूने अज्ञात इसमाने येऊन त्यांच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूचा तुकडा मारला. यामध्ये अनिकेत गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेत असताना त्याच्या खिशातून 35 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन पडून गहाळ झाला आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.