तरुणाला चाकू मारून मोबाईल लांबवला : चोरटा जाळ्यात

जळगाव : तरुणाला चाकू मारत त्याच्या हातातील मोबाईल लांबवणार्‍या चोरट्यास जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. रणजीत उर्फ बबलू हिरालाल जोहरे (19, रा.शिवाजी नगर, हुडको, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, एका अल्पवयीन संशयीतासह ताब्यात घेण्यात आले आहे.

चाकूहल्ला करीत लांबवला मोबाईल
अविनाश सोनवणे हा आपल्या कुटुंबियासह बांभोरी येथे वास्तव्याला आहे. शहरातील मानराज पार्क समोरील नवजीवन शुपर शॉपच्या बाजूला वास्तव्यास असलेल्या सुशील साळुंखे यांच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरीला आहे. 14 फेब्रुवारी रोजी काम केल्यानंतर ते रात्री पायी निघाले असतानाच मानराज पार्कजवळील दिलासा व्यसनमुक्ती केंद्रासमोरून दुचाकीवरून आलेल्या दोघत्तंनी मोबाईल हिसकावला मात्र अविनाश यांनी मागे बसलेल्या तरुणाला लागलीच पकडताच संशयीताने चाकू काढून अविनाश यांच्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयीत आरोपी रणजीत उर्फ बबलू हिरालाल जोहरे (19) याच्यासह अन्य एका संशयीताच्या दुध फेडरेशन, शिवाजी नगरात परीसरातून मुसक्या आवळत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम.एच.19 डी.जे.5017) आणि मोबाईल जप्त केला. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, अविनाश देवरे आदींच्या पथकाने केली.