जळगाव : शहरातील कासमवाडी येथे जुन्या वादातून झालेल्या भांडणातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार संशयीतीला अटक करण्यात आली आहे. रोहित उत्तम भालेराव (कासमवाडी, जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
जुन्या वादातून केला होता हल्ला
कासमवाडी येथे जुन्या वादातून प्रशांत गोपाल चौधरी या तरूणावर रोहित भालेराव यांच्यासह तीन ते चार जणांनी चाकू हल्ला केला होता. याप्रकरणी प्रशांत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुनील रसाल राठोड ,अनिल राठोड, अमन चंद्रकांत सोनवणे यांना अटक करण्यात आली तर रोहित भालेराव पसार होता. गोपनीय माहितीवरून निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सुनील सोनार, सुधीर साळवे, किशोर पाटील, मुकेश पाटील, मुदत सरकारची यांनी बुधवारी तुकारामवाडी भागातून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.