तरुणावर चाकू हल्ला, पिस्टलसह दोघे आरोपी जाळ्यात

0
बाजारपेठ पोलिसांची कामगिरी ; तिसरा आरोपी पसार
भुसावळ:- जुन्या भांडणाच्या कारणातून शहरातील तरुणावर तिघांनी पिस्टलाचा धाक दाखवत चाकू हल्ला केल्याची घटना बुधवार, 18 रोजी घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध सुरू होता. गुप्त माहितीनंतर संशयीत आरोपी अमोल काशिनाथ राणे, अक्षय प्रकाश न्हावकर (रा.श्रीराम नगर,चमेली बाग, भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपींचा तिसरा साथीदार मयूर विनोद बडगे पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निशीकांत जोशी, किशोर महाजन,  दीपक जाधव, नीलेश बाविस्कर यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.