तरुणावर तुकारामवाडीत कोयत्याने वार : दोघांविरोधात गुन्हा

भुसावळ/जळगाव : वाद घालू नका, असे बोलल्याच्या रागातून दोन जणांनी तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार केला. ही घटना तुकाराम वाडीतील हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
आकाश गोकुळ पारे (25, रा.दत्त मंदिराजवळ, तुकाराम वाडी, जळगाव) हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तुकाराम वाडीतील हनुमान मंदीराजवळ गोल्या ठाकूर (रा.जैनाबाद) आणि विशाल चौधरी (शंकरराव नगर) या दोघांचा वाद सुरू असतांना आकाश पारे हा तिथे आला व म्हणाा की, तुम्ही वाद का करता व या रागातून गोल्या ठाकूर याने त्याच्या कमरेला लावलेल्या कोयत्याने आकाशच्या डोक्यावर वार केले. यात आकाश हा गंभीर जखमी झाला तर विशाल चौधरी याने शिवीगाळ करून मी तुला पाहून घेईन असा दम दिला. याप्रकरणी आकाश पारे याच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी गोल्या ठाकूर (जैनाबाद) आणि विशाल चौधरी (शंकरराव नगर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार योगेश सपकाळे करीत आहे.