तरुणावर वार

0

निगडी : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाने निगडी येथील एका तरुणावर वार केले. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दीपक सुरेश गडसिंग (वय 20, रा. अशोक सम्राट हाऊसिंग सोसायटी, ओटा स्कीम निगडी) याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशांत संजय ठाकरे (वय 28, रा. अशोक सम्राट हाऊसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) याने फिर्याद दाखल केली आहे. विशांत व दीपक यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून दीपक याने विशांत याच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. त्यात विशांत याच्या हाताला व मानेवर इजा झाली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.