तरुणींनी भावनिक न होता स्वतःच घ्यावेत निर्णय -सारीका कोडापे

0

वरणगावातील कला, वाणिज्य महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन

वरणगाव- वरणगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. कोडापे विद्यर्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मुलींनी भावनिक न होता आपला निर्णय स्वतः घ्यायला हवा. आजचे युग हे मुलींचे असून त्यांच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. त्याचा योग्य वापर करावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल शिंदे म्हणाले की, विद्यार्थिनींनी आपले करीयर घडवतेवेळी अभ्यास करावा. महाविद्यालय मुलींच्या विकासासाठी युवती सभेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील थोर व्यक्तींचे व्याख्याने आयोजित करते, त्याचा फायदा घेऊन आपले जीवन यशस्वी करावे. सूत्रसंचालन प्रा.डॉ इंदिरा पाटील यांनी तर आभार देवयानी वाघ या विद्यार्थिनीने मांडले. कार्यक्रमास विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.बी.जी.देशमुख, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.निलीमा इंगळे, जोशी, प्रा.के.बी.पाटील, प्रा.अशोक चित्ते, प्रा.नितीन बाविस्कर, निकम, रवी पाटील व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रम राबविण्यास प्रभारी प्राचार्य पी.बी.देशमुख यांनी परवानगी दिली.