भिवंडी – कोंबडपाडा येथील म्युन्सिपल कॉलनीतील बिल्डिंग नं.८ च्या रूम नं.१७ मध्ये झोपलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या घरात शिरून मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला निजामपूर पोलिसांनी गजाआड केले आहे.सचिन सुरेश सकपाळ ( २५ ) असे विनयभंग प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नांव आहे.
त्याने शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या तरुणीशी जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला.मुलीने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी धाव घेवून सचिन यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी.डी.घोगरे करीत आहे.