तरुणीचा विनयभंग, तरुणाविरुध्द गुन्हा

0

तरुणीचा विनयभंग, तरुणाविरुध्द गुन्हा
शहादा :
लोणखेडा महाविद्यालयातील ग्रंथालयात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुलतानपूर येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेेशर लक्ष्मण पाटील (रा.सुलतानपूर, ता. शहादा) हा पिडीत तरुणी आणि तिच्या महाविद्यालयीन मैत्रिणींवर वाईट नजर ठेवून होता. यासदंर्भात त्याच्याविरुध्द प्राचार्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीतून त्याला तीन महिने महाविद्यालयात येण्यास मनाई केली होती. त्यानंतर 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पिडीत तरुणी गेल्यावर ज्ञानेश्‍वर पाटील हा तेथे आल्यावर त्याने तिला लज्जा वाटेल, असे कृत्य केले. तसेच तिच्या पिशवीतून जबरीने तीन हजार 500 रुपये काढून घेतले. याबाबत पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन वरील तरुणाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोसई बडगुजर करीत आहेत.