धुळे- लग्न जमलेल्या तरुणीस मारहाण करीत तिच्याकडील 20 ग्रॅमचे दागिने लांबवत भावी नवर्यास तिचे अश्लील फोटो दाखवल्याची धमकी देणार्या दोघांविरुद्ध थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर तालुक्यातील तर्हाडी येथील 21 वर्षीय तरुणीने थाळनेर पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली. गावातीलच सम्राट साहेबराव पाटील व चक्रधर प्रकाश पाटील यांनी भावी नवर्यास आपले अश्लील फोटो दाखवून बदनामी करत होणार संसार उध्वस्त करण्याची धमकी दिली तसेच 7 डिसेंबर 2018 रोजी आरोपींनी घरी येत विनयभंग करून आपल्याला मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली व घरात ठेवलेले 20 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून पसार झाल्याच्या आरोपावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींना अटक करण्यात आली.