तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0

भोसरी : येथील फुलेनगरमध्ये एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. श्रीदेवी शरणाप्पा पाटोळे (वय 17, रा. फुलेनगर) असे तरुणीचे नाव आहे.

ती अकरावीमध्ये शिकत होती. काल रात्री तिने घऱातील स्वयंपाक घरात स्कार्फच्या सहायाने गळफास घेतला. सकाळी आईने स्वयंपाक घराचा दरवाजा ठोठावला. परंतू काहीच प्रतीसाद मिळाला नाही. त्यामुळे तिच्या आई-वडीलांनी दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.