तरुणीच्या छेडखानी प्रकरणी पसार आरोपीस अटक

0

भुसावळ- अल्पवयीन तरुणीची छेडखानी करून तिचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात रीपाइं पदाधिकार्‍याच्या अल्पवयीन मुलासह हर्षल जितेंद्र चौधरी (22, राम मंदिराजवळ, भुसावळ) विरुद्ध पोस्को तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत पसार असल्याने त्याचा कसून शोध सुरू होता. आरोपी गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, किशोर महाजन, विकास सातदिवे यांनी त्यास शुक्रवारी अटक केली.