चाळीसगाव । तालुक्यातील खडकी शिवारातील एका शेतात 18 ते 20 वर्षीय तरुणीला जाळून ठार मारल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली होती या प्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. समाधान धर्मा कोळी यांच्या मालकिच्या शेतात शुक्रवारी रात्री 10 वाजेनंतर आरोपींनी तरुणीला पैखाट्याच्या काड्यांमध्ये टाकून पेटवून दिले होते. घटनेची माहिती कळताच उपअधीक्षक अरविंद पाटील तसेच चाळीसगावचे निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, उपनिरीक्षक घोळवे, हवालदार शशीकांत पाटील आदींनी धाव घेतली होती.