Kidnapped minor girl from Sule village: Crime against youth मुक्ताईनगर : तालुक्यातील सुळे गावातील अल्पवयीन तरुणीला लग्नाच्या आमिषाने फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी तरुणाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाविरोधात गुन्हा दाखल
अल्पवयीन तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील संशयीत गौरव श्रीकृष्ण नेमाने (सुळे) याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच काहीतरी फूस लावून शुक्रवार, 28 रोजी सकाळी 10 वाजता पळवून नेले. तपास हवालदार श्रावण गोंडू जवरे करीत आहेत.