वाकड : नोकरी लावतो म्हणून तरुणीची 95 हजार रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव उर्फ समीतकुमार संभूनाथ सिंग (रा. श्रीमणी इस्टेट, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. विवेक शुक्ला (वय 29 रा. भुमकर चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी शुक्ला यांच्या पत्नीस हिंजवडी फेज-3 मधील नामांकित कंपनीमध्ये नोकरी लावतो असे नोकरीचे आमीष दाखवून 13 जून ते 10 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत आरोपीन त्याच्या बँक खात्यावर 95 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने टाकण्यास सांगितले. मात्र नोकरी लावली नाही.