तरूणांनी आंधळेपणाने करिअर निवडल्यास प्रगतीत अडथळे

0

ळगाव (प्रतिनिधी) – आज करिअरची अनेक क्षेत्रे तरूणांसाठी खुली आहेत. पण त्यांची आंधळेपणाने निवड करणे म्हणजे आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासारखे आहे असे प्रतिपादन प्रविण सोनवणे यांनी केले. करिअरची अचूक निवड म्हणजे यशस्वी भविष्याकडे वाटचाल म्हणून विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडता यावे या उद्देशाने एसडी-सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उदयोजक विकास योजना, जळगाव यांच्या वतीने अभिनव माध्यमिक विद्यालय येथे एसडी-सीड असोसिएट ‘करिअर मार्गदर्शन’ या विषयावर कार्यशाळेत बोलत होते.

त्रिसुत्रीचा उपयोग करून करिअरची निवड
सोनवणे यांनी पुढे सांगितले की, करिअरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे. आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्वाचे मानले जाते. ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते तसेच करिअरचे नियोजन केल्याने सामान्य बुध्दीमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पाहेचू शकतात. विद्यार्थ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. आपली आवड, क्षमता, पात्रता या त्रिसुत्रीचा उपयोग करूनच करिअरची निवड केली पाहिजे. तसेच आयुष्य जगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ‘करिअर’ आहे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती या शालेय वयातच निर्माण होणे अत्यंत महत्वाचे आहे.

मुल्यमापण चाचण्यांचा उपयोग करावा
आज करिअरची अनेक क्षेत्रे तरूणांसाठी खुली आहेत. पण त्यांची आंधळेपणाने निवड करणे म्हणजे आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासारखे आहे. आज तुमची क्षमता, कौशल्य व आवड यांचे विष्लेषण करून तुम्हाला सुयोग्य मागदर्शन मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी अनेक मुल्यमापण चाचण्या उपलब्ध आहेत. त्या तुमच्यातील दृष्य गुणांबरोबरच सुप्त गुणांचाही विचार करतात व तुमची प्रगती कोणत्या क्षेत्रात अधिक असू शकते या विषयी गाईडलाईन देतात. म्हणून अशा चाचण्या करून घेणे हेही करिअर निवडीसाठी महत्वाचे आहे. तसेच प्रविण सोनवणे यांनी दहावी नंतरच्या उपलब्ध विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी मुख्याध्यापिका सरोज तिवारी, बारेला, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.