तरूणांवर स्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी

0

शिंदखेडा। इंग्रजांच्या काळात तरूणांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीची मशाल पेटवली व या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केले. मात्र हे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी आजच्या तरूण युवकांवर आहे असे प्रतिपादन प्रा.पी.टी.पाटील यांनी केले. येथील एम.एच.एस.एस.कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा.डी.ए.पवार होते.

यावेळी प्रा.पाटील पूढे म्हणाले,स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक लढे झाले. त्यापैकी 1857चा उठाव, हा लढा यशस्वी झाला असता तर देश त्याचवेळी पारतंत्र्यातून मुक्त झाला असता. यानंतर अनेक हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले, बलीदान द्यावे लागले. अनेक क्रांतीवीरांच्या बलीदानाने मिळवलेले हे स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी आजच्या तरूणांनीच नव्हे तर देशातील सर्व नागरीकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

विविध प्रसंगांवर प्रकाशझोत
यावेळी प्रा.पाटील यांनी जालीयनवाला हत्याकांड, खान्देशातील खजीना लूट आदि प्रसंगांवर प्रकाशझोत टाकला. तसेच लोकमान्य टिळक,राजगुरू ,भगतसिंग,शिरीषकुमार यांनी केलेल्या बलीदानाची माहिती दिली. अभाविपच्या चांदवडे म्हणाल्या,भारतीय स्वातंत्र लढयात स्त्रीयांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे.आजच्या युवतींनी देखील या स्त्रीयांचा आदर्श घेवून अन्याय व अत्याचारा विरूध्द आवाज उठवावा असे आवाहन केले. यावेळी प्राचार्य डि.सी.गिरासे उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रा.सी.डी.डागा यांनी केले.