तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव । भुसावळकडून जळगावकडे घरी जात असतांना नशिराबादजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 30 वर्षीय दुचाकीस्वार जखमी झाल्याने जवळील गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी 4 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नशिराबाद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेली माहिती अशी की, अरूण प्रभाकर महाजन (वय-30) आपल्या पत्नी व मुलासह शहरातील अयोध्या नगरात राहतात. आई व मोठा हे आधीपासून भुसावळातील लक्ष्मीनारायण नगरात राहतात. आई भुसावळला राहत असल्याने आईला भेटण्यासाठी भुसावळला मोटारसायकल क्र.(एमएच 19 एएफ 5964) ने गेले. भाऊ व आईला भेटल्यानंतर अयोध्यानगरकडे येत असतांना नशिराबादजवळ 10 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत ते दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जवळील नागरीकांनी तात्काळ गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

व्हॉटसअ‍ॅपवरून पटली ओळख
अरूणचा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी तात्काळ गोदावरी रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तोपर्यंत ओळख पटविणे कठीण झाले होते. त्याआगोदर काही नागरिकांनी सोशल मिडीयावर दुचाकीचा आणि जखमी अरूणचा फोटो व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल केला गेला. त्यामुळे नेहमीप्रमाणे अरूण महाजन यांचा मोठा भाऊ गणेश प्रभाकर महाजन यांनी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मोबाईलमधे व्हॉटसअ‍ॅप बघितल्यानंतर जखमी व्यक्ती कोणी नसून आपलाच भाऊ असल्याचे समजले. त्यांना तात्काळी बहिण वंदना शंकर चौधरी रा. सावदा यांना मोबाईलद्वारे कळवून येण्याचे सांगितले.

पत्नी होती माहेराला
पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी यावलला भावाकडे गेल्या होत्या. त्यामुळे घरात कुणीच नसल्याने भुसावळला आई व भावाला भेटण्यासाठी गेला होता. मयत अरूण महाजनच बहिण व भाऊ यांना सकाळी भावाचा अपघात झाल्याचे कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ नशिराबाद पोलिस स्थानकात धाव घेवून अपघातातील जखमी हा गोदावरी रूग्णालयात दाखल केले असल्याचे समजले. त्यांनी तेथून थेट गोदावरी रूग्णालयात धाव घेतली.

उपचारा दरम्यान मृत्रू
मयत अरूण महाजन हा अगोदर रिक्षा चालविण्याचे काम करत होता. त्यानंतर रिक्षा चालविणे सोडून त्यांनी केळीचे वेफर्स बनविण्याचे काम सुरू केले होते. त्यांच्या कामात त्यांची पत्नी कल्पना महाजन देखील मदत करत होती. स्वामी महाजन हा चार वर्षाचा मुलगा असून वडील नाही. आई नर्मदाबाई महाजन आणि भाऊ गणेश महाजन भुसावळला राहतात. अपघातातनंतर गोदावरी रूग्णालयात दाखल केल्या नंतर आज सायंकाळी 4.10 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते.