तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

0

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात घेत होता शिक्षण

जळगाव । केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्प्यूटर इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणार्‍या 27 वर्षीय विद्यार्थ्यांनी आसोदा फाट्याजवळील शेत शिवारातील शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्याचे केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उडकीस आली. या घटनेबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तो राहिलेल्या विषयाचा अभियांत्रिकीचा पेपर देण्यासाठी जळगावी आला होता. प्रदीप समाधान कोळी (वय-27) रा. सुकळी ता. मुक्ताईनगर ह.मु.धुळे हा तरूण शहरातील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्प्यूटर इंजिनिअरींग शेवटच्या वर्षाला होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना शेवटच्या वर्षात एक विषय राहिल्याने तो पेपर देण्यासाठी जळगावात आला होता. तत्पुर्वी भुसावळला मावशी राहत असल्याने 28 रोजी भुसावळला गेला. त्यानंतर भुसावळ पासून जवळ असलेल्या दिपनगर येथे मेहुणे राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी 2 मे रोजी गेला. मेहुण्याकडे जेवण करून दुपारी 2 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला. सायंकाळी पुन्हा भुसावळात येवून मावसभाऊसोबत पिक्चरला गेले. त्यानंतर रात्री मुक्काम करून 3 मे रोजी सकाळी 9 वाजता जळगावला जाण्यासाठी निघाला. दरम्यान अभियांत्रिकीचा शेवटचा पेपर असल्यामुळे तो कोणाकडे गेला याची माहिती कुणालाच नव्हती.

सकाळी आली उघडकीस
गुरूवारी रात्रीच्या सुमारास असोदा रेल्वे फाट्याच्या पुढे असलेल्या आसोदा शिवारातील तुषार काळे यांच्या गट क्रमांक 14/73 शेतातील झाडाला नॉयलॉन दोर बांधून गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी 10 वाजता शेतात कामासाठी जाणार्‍या काही जणांनी घडलेला प्रकार रेल्वे गेटमनला सांगितला. त्याने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविण वाडीले यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देत तरूणाचा मृतदेह खाली उतरविला. दरम्यान, घटनास्थळाची हद्द तालुका पोलीस ठाण्याची असल्याने ते देखील घटनास्थळी पोहचले होते.

3 वर्षांपुर्वी वडील व भावाने घेतला होता गळफास
मयत प्रदिप कोळी यांचे वडिल समाधान कोळी व लहान भाऊ यांनी तिन वर्षांपुर्वी याचपद्धतीने गळफास घेवून एकाच दिवशी आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांच्या मानसिक दृष्ट्या ताण पडल्याने त्याचे मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदिप जोशी यांच्याकडे उपचार सुरू होते. तशाच पद्धतीने शुक्रवारी मध्यरात्री आसोदा शिवारातील शेतात आत्महत्याची घटना सकाळी उघकीस आली. या आत्महत्येमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मोठा भाऊ भगवान समाधान कोळी हा विवाहित असून कामानिमित्त धुळ्यात राहतो. त्याच्यासोबत मयत प्रदिप कोळी यांच्या पत्नीसह आई कोकिलाबाई कोळी यांच्यासह धुळ्यात राहतात.