तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव – आत्याकडे राहणाऱ्या 23 वर्षीय तरूणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील महाबळ रोडवरील सनम प्लाझा येथे घडली असून एकच खळबळ उडाली होती. याबाबत रामानंद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजयकुमार सुर्यभान सिंग (वय-23) रा. सनम प्लाझा, महाबळ रोड जळगाव हा मुळचा राहणार कोल्हूबार जि. गया झारखंड येथील रहिवाशी असून जळगावात एका हॉटेलवर कामावर आहे. शहरात सनम प्लाझा, महाबळ रोड मयताची आत्या शकुंतला व्दारका प्रसाद सिंग यांच्याकडे राहत होता. घरात त्यांच्या रोजच्या राहत्या खोलीत रात्री झोपला. सकाळी उशीरापर्यंत न उठल्याने आत्या शकुंतला यांनी दरवाजा ठोठावला मात्र घरातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आत डोकावून पाहिले असता त्यांने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. याबाबत रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान आत्महत्या करण्याचे कोणतेही कारण समजू शकले नाही. जिल्हा रूग्णालयातील डॉ. नितीन बरडे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.