जामनेर । येथील इंदिरा आवास नगरमधील एका विवाहित युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 16 जानेवारी च्या रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान घडल्याचे समजते. शहरातील इंदिरा आवास नगर मधील नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर मोरे यांचा मुलगा मुकेश याने 16 सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान आपल्याच घरातील खोलीत दोरीने गळफास लावत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घरच्या लोकांच्या हि घटना लक्षात आल्यावर त्याला पाहिले असता, मुकेश (वय-28) हा जमिनीवर पडला होता. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के.पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले. या आधीही मुकेश याने एक/दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.