तरूणावर दोघांकडून तलवार हल्ला

0

जळगाव । भुसावळ शहरातील महात्मा फुले नगरात शनिवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन भावांनी तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करून एकास जखमी केले.

भुसावळ येथील महात्मा फुले नगरात शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास महिलांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी समाधान उखा सोनवणे हा त्यांना समजावण्यासाठी गेला. त्यावेळी सुनील जोनवाल, दिलीप जोनवाल हे त्या ठिकाणी आले. त्यांनी सोनवणे तलवारने हल्ला करून मारहाण केली.