तर्हाडी । शिरपूर तालुक्यातील तर्हाडी येथील जि. प. शाळेतील डिजीटल वर्गांतील प्रोजेक्टरची दुसर्यांदा चोरी होण्याची घटना घडली आहे.
जिल्हा परिषदेचा मराठी शाळेला लोकवर्गीणीतून 30 हजार रूपयांचा पहिला प्रोजेक्टर डिजीटल वर्गांसाठी 2016 साली घेण्यात आला होता. परंतु, हा प्रोजेक्टर चोरट्यांनी चोरून नेला आहे. विद्यार्थी दृकश्राव्य शिक्षणापासून वंचीत झाल्याचे शाळेचे माजी विद्यार्थी व मुंबई येथे रेल्वे पोलीस असलेले युवराज मुरार जाधव यांनी 30 हजार रूपयांचा दुसरा प्रोजेक्टर शाळेला भेट म्हणून दिला. मात्र, हा प्रोजेक्टर सुद्धा चोरीस गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी पहावया मिळत आहे. मुख्याध्यापक गणेश यादव पवार यांनी शिरपूर पोलीसांत फिर्याद दिली आहे. शासनाचा डिजीटल शाळेचा उद्देश लोकवर्गणीतून ग्रामस्थ साकार करण्याचा प्रयत्न करीत असतांना चोरट्यांनी त्याला सुरूंग लावला आहे.