तर्‍हाडी जि.प.शाळेला पुस्तकांची भेट

0

तर्‍हाडी । येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे पुणे येथील आंनद वाचन चळवळीचे संचालक प्रवीण महाजन यांनी 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनिय गोष्टींची 200 पुस्तके व यशलीला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सचित्र बालमित्र 100 पुस्तके भेट दिलीत.

वाचनाने गुणवत्तेत वाढ
यावेळी पी. डी. रणदिवे, प्रविण महाजन, राजेंद्र पाटील, एन. एच. कश्यप, गणेश पवार, महेंद्र खोंडे, रावसाहेब चव्हाण, दिलीप गिरासे यांच्या हस्ते वाटप झाले. प्रविण महाजन, रवि गवळे व पी. झेड. रणदिवे यांनी या वाचनीय पुस्तकांतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व त्यांच्या गुणवत्तेत वाढ या गोष्टींचा विकास होईल याविषयी विचार मांडले. यशस्ववितेसाठी शिवांगी देवरे, बोरसे, गवळे, वंदना अहिरे, आर. एस. चव्हाण आदींनी कामकाज पाहिले.