तर्‍हाडी परिसरात कांद्याने केला शेतकर्‍यांचा वांदा!

0

तर्‍हाडी। शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडीसह परिसरातील शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. कारण कुपनलिकांची भुजल-पातळीही खालावली आहे. तसेच वरून कांद्याची लागवड केली पण सध्या कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकर्‍याचा वांदा केला आहे. तर्‍हाडी परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. मात्री सध्या स्थितीला कांद्याला भाव नसल्यामुळे उत्पादन खर्च निघणेही अवघड बनले आहे.

साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च
बियाणे, कांदा लावनी मजुरी, निंदणी, किटकनाशके फवारणी, कांदा उपाडणी, खांडणी आदीवर मोठा खर्च आजपर्यंत झाला आहे. तसेच विक्रीला नेण्यासाठी एका क्विंटलमागे जवळपास 160 ते 170 रूपये खर्च येत आहे व कांद्याला जवळपास 300 ते 600 रूपये पर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. सरकारने कांद्याची निर्यात सुरू करावी, अशी शेतकरी वर्गातून होत आहे. जर कांदाची निर्यात सुरू झाली तर भाव वाढल्यास मदत होईल, महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी कमी भाव असले तरी शेतकर्‍यांनी साठवणुकींवर भर न देता विक्रीस प्राधान्य दिले आहे. कारण साठवणुकीसाठीचा खर्च ही मोठ्या प्रमाणावर येतो. त्यासाठी कांदाचाळ उभारणे गरजेचे असते. तसेच घट व सडचे प्रमाणही वाढते व पुढेही चांगला भाव मिळेल याची शाश्‍वती नसते. त्यामुळे विक्रीस प्राधान्य दिले जात आहे. सरकारने व नाफेडने हमीभावाने कांदा खरेदी करावी अशी मागणी महेंद्र पाटील यांनी केली आहे तर कांद्यालाही सरकारी अनुदान देण्याचे रूपचंद पाटील यांनी सांगितले आहे.