तर्हाडी । आण्णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालय तर्हाडी येेथे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ बाबत जनजागृतीसाठी गावातून रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष निंबा नथ्थु भामरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुधीर भामरे मुख्याध्यापक एन. एच. कश्यप, डी. बी. पाटील, कार्याध्यक्ष सुभाष भामरे आदी उपस्थित होते.
रॅलीतून स्त्रीभ्रृण हत्या, मुलगी परमेश्वराचे दुसरे रूप आहे, बेटीयाँ क्या होती है, गर्भांतील मुलीची कहाणी, नारी काय असते याबाबत पथनाट्य सादर करण्यात आले. यात प्रितम भामरे, रूकैया कुरेशी, वैभवी भामरे, मयुरी पाटील, जयश्री पाटील, व सोनल भागवत यांनी पथनाट्यात सहभाग घेतला. लोणखेडा येथील शेतकी विद्यालयाचे कृषीदूत हे देखील सहभागी झाले होते. याचे आयोजन निता पाटील व भावेश पाटील यांनी केले होते. यशस्वीतेसाठी रावसाहेब चव्हाण यांनी कामकाज पाहिले.