तर्हाडी। शिरपूर तालुक्यातील तर्हाडी येथे शिवसेनेतर्फे शेतकर्यांसाठी कर्जमुक्ती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी धुळे जिल्हा शिवसेना उपप्रमुख हिंमत महाजन, शिरपूर तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, माजी तालुकाप्रमुख छोटूसिंग राजपूत, सोनार, गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भरतसिंग राजपूत म्हणाले की, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबाला आहे.
सरकारी व अस्मानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत आहे. बँका कर्जे देत नाहीत, जे दिलेले आहे ते वसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे शेतकरी संपावर गेला आहे. शेतीमालाला व्यवस्थीत भाव मिळत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. शिवसेनेमार्फत शेतकर्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. यावेळी उपस्थित शेतकर्यांकडून विलास भामरे, भरतसिंग राजपूत, छोटू राजपूत, हिम्मत महाजन, सोनार यांनी कर्जमुक्तीचे फॉर्म भरून घेतले व ते सर्व फॉर्म मुख्यमंत्र्यांकउे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.