तर्‍हाडी येथे साखरपुड्यातच पार पडला विवाह

0

तर्‍हाडी । येथील शेतकरी आसाराम पितांबर पाटील याची मुलगी नंदनी पाटील व धरणगाव (जिल्हा जळगाव) तालुक्यातील आव्हाणे येथील पुडलिक काशिनाथ कुवर (ह.मु. सुरत) यांचा मुलगा प्रविण कुवर यांचा शुक्रवार, 20 रोजी तर्‍हाडी येथे विवाह सोहळा पार पडला. साखरपुड्याच्या कार्यक्रमातच व अनेक चालिरितींना फाटा देत हा विवाह सोहळा पार पडल्याने हा विवाह सोहळा आदर्श ठरला आहे.

चालिरितींना फाटा
नंदनी ही अपंग असून प्रविण यांनी सांभाळण्याचा निर्धार केला आहे. या विवाह सोहळ्यात हुंडा नाही, लग्न पत्रिका व आहेर देणे व घेणे नाही, त्यामुळे सोहळ्यासाठी उपस्थित नातेवाईक व दोन्ही गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. आजच्या युगात वर-वधु यांचे लग्न धूमधडाक्यात करतात यासाठी लाखो रुपये खर्च तर होतोच शिवाय धावपळही होते. परंतु, या दोन्ही पक्षातील लोकांनी पारंपरिक चालीरीतीला फाटा देत व नातेवाईकांचा विचार न करता व हुंडा न घेता लग्न लागल्यामुळे समाजात व परिसरात असे आदर्श विवाह कौतुकास्पद ठरणार आहेत. विवाहसोहळ्याप्रसंगी मुलीचे मामा रमेश वाघ, मुलाचे मामा भिकन पाटील, सरपंच कैलास भामरे, माजी उपसरपंच ओंकार पाटील, बाजीराव भामरे, शिवाजी बोरसे, धनराज करके, सुभाष पाटील, श्रवण पाटील आदी उपस्थित होते.