तर्‍हाडी विद्यालयात आदर्श क्रीडा पुरस्काराचे वितरण

0

तर्‍हाडी । आण्णासो. साहेबराव सोमा पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिरपूर तालुका शारिरीक शिक्षक संघटनेतर्फे व साहेबराव सोमा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजय भामरे व शिरपूर तालुक्यातील क्रीडाभिष्म प्राध्यापक वाय.टी. शिंगणे, प्राचार्य व्ही.एस. मराठे, संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, उपाध्यक्ष निंबा भामरे, कार्याध्यक्ष सुभाष भामरे, मुख्याध्यापक एन.एच. कश्यप, संघटनेचे माजी अध्यक्ष के.डी. चौधरी (मुख्याध्यापक), उपाध्यक्ष सुनिल जडीये, विद्यमान अध्यक्ष ए.डी. महाजन यांच्या हस्ते 12 शिक्षकांना गौरवण्यात आले.

या 12 शिक्षकांमध्ये सुरेश बोरसे (वाघाडी), किशोर वसुले (शिरपूर), दिलीप पाटील (तर्‍हाडी), सुभाष निकुंभे (भोरखेडा), मनोज पाटील (वरुळ), कृष्णदास पाटील (शिरपूर), सुभाष पवार (विखरण), सिमा माळी (सांगवी), विजय बागुल (रोहिणी), विजयकुमारचंद (दहिवद), दिनेश पावरा (रोहिणी), भूषण चव्हाण (शिरपूर) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन क्रिडा संयोजक रावसाहेब चव्हाण यांनी केले. आभार प्राचार्य नितीन पाटील यांनी केले.